बळीराजा पुन्हा अडचणीत! राज्यात अवकाळी पावसाची शक्यात, हवामान विभागाचा अंदाज Maharashtra Unseasonal Rain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Unseasonal Rain

बळीराजा पुन्हा अडचणीत! राज्यात अवकाळी पावसाची शक्यात, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Unseasonal Rain: राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडण्याची शक्यता आहे. सोमवार पासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मराठवाडा- मध्य महाराष्ट्रात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भात देखील 14 ते 16 मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे. 

तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. या अकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांचा मोठा फटका बसणार आहे. मागील काही दिवसांपुर्वी राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

त्यानंतर ही पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. जिल्ह्यातील खोरी टीटने भागात ही गारपीट झाली आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामध्ये गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.