
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत.
मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिला कल भाजपच्या बाजुने लागला आहे. भाजपने सुरवातीच्या कलानुसार शतक पूर्ण केले असून, महायुतीने सुमारे 168 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, महाआघाडी 78 जागांवर पुढे असल्याचे चित्र आहे.
विजयाचा टिळा कुणाच्या माथी; विधानसभेची आज मतमोजणी | Election Results 2019
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली आहे. काही अपवाद वगळता यापैकी सर्व "आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष आहे.
पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुरक्षित कोथरूड मतदारसंघ निवडल्याने सुरवातीला त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता, त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील लढत मराठवाड्यासह राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने वरळी मतदारसंघाचा निकाल औत्सुक्याचा ठरणार आहे.