esakal | विधानभवनाच्या आवारात प्रति-विधानसभा; जयंत पाटील संतापले..
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant-Patil

विधानभवनाच्या आवारात प्रति-विधानसभा; जयंत पाटील संतापले..

sakal_logo
By
विराज भागवत

अशी वागणूक करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशी केली मागणी

मुंबई: भाजपाच्या (BJP) १२ आमदारांचं काल वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्यावरुन राज्यभरात भाजपा आक्रमक झाली. महाराष्ट्रात वगेवेगळ्या ठिकाणी भाजपाची आंदोलनं (Protest) सुरु आहेत. विधिमंडळ परिसरातही याचे तीव्र पडसाद उमटले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच (Maharashtra assembly) भाजपाने प्रति विधानसभा (Vidhan Sabha) सुरु केली. विधासनभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निषेधाचा प्रस्ताव मांडला. पण त्यांच्याकडून माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आला. त्यानंतर या प्रति-विधानसभेबद्दल प्रकाराबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan BJP starts Proceedings on staircase of Vidhan Bhavan Jayant Patil Unhappy)

हेही वाचा: विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

"मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी", अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न केला. त्यावरून जयंत पाटील यांनी विरोधी सदस्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. विधानसभेत बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे", अशा शब्दात त्यांना नाराजी बोलून दाखवली.

loading image