Jayant Patil News : राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदे? जयंत पाटील म्हणाले... | NCP News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Jayant Patil News

Jayant Patil News: राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदे? जयंत पाटील म्हणाले...

NCP News: राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. यादरम्यान अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधारी यांच्यात तुफान खडाजंगी पाहिला मिळाली. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे विधान विधानपरिषदमधील प्रतोद आणि गटनेते पद रिक्त झालं होतं.

राष्ट्रवादीने विधानपरिषदेत गटनेते म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली. मात्र यामध्ये विधीमंडळाकडून गंभीर चूक झाली होती. त्या चूकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नेमणूक करावी, असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापतींना पाठवले होते. मात्र, विधान परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावा ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव आढळून आल्याने जयंत पाटलांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंवर निशाना साधला.

जंयत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल देशाचे पंतप्रधानच बदलेले. मुर्मू मॅडम देशाच्या पंतप्रधान आहेत. तर राष्ट्रवादीच्याही विधीमंडळ गटनेते पदावर नेमणूक व्हावी, अशी इच्छा शिंदे यांची दिसत आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Shiv SenaNCP