Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

Vidhan Sabha 2019 : महायुतीवरच पसंतीचा शिक्का

राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा
मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली. 

महाराष्ट्र आणि हरियाना या राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपसमोर सत्ता, तर काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. बंडखोरांमुळे भाजपप्रणीत महायुतीची महाराष्ट्रात २२० ची ‘मॅजिक फिगर’ गाठताना दमछाक होऊ शकते, असे सट्टेबाज म्हणतात. या दोन्ही राज्यांतील निवडणुकांवर ३० हजार कोटींचा सट्टा लागला आहे. 

महाराष्ट्रात महायुतीला २८८ पैकी २१० ते २१५ जागा मिळतील, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जेमतेम ५५ ते ६० जागांची मजल गाठेल, असे सांगितले जाते. एमआयएम आणि मनसे यांना प्रत्येकी एक किंवा दोन जागांवर समाधान मानावे लागेल, असा सट्टेबाजांचा होरा आहे.  हरियानातही भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे ‘बुकी’ सांगतात. राज्यातील एकूण ९० पैकी भाजपला जवळपास ७५ जागा मिळतील, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com