
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, हेविवेट नेते छगन भुजबळ विरुद्ध शिवसेना- भाजप महायुतीचे संभाजी पवार अशी लढत या मतदारसंघात जोरात रंगली आहे. भुजबळांनी गेली पाच वर्षे सोडली तर या मतदारसंघाचा विकासातून कायापालट केला आहे. या उलट येथील राजकारणात ४० वर्षांपासून वर्चस्व असलेल्या पवार कुटुंबीयांतील संभाजी पवार दुसऱ्यांदा भुजबळ यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.
विधानसभा 2019 : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, हेविवेट नेते छगन भुजबळ विरुद्ध शिवसेना- भाजप महायुतीचे संभाजी पवार अशी लढत या मतदारसंघात जोरात रंगली आहे. भुजबळांनी गेली पाच वर्षे सोडली तर या मतदारसंघाचा विकासातून कायापालट केला आहे. या उलट येथील राजकारणात ४० वर्षांपासून वर्चस्व असलेल्या पवार कुटुंबीयांतील संभाजी पवार दुसऱ्यांदा भुजबळ यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. सामाजिक काम आणि नाते-गोते या मुद्द्यावर पवार प्रभावी उमेदवार ठरले आहेत. येथे भुजबळांनी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केलाच; पण दरसवाडी- डोंगरगाव कालव्याला १९७२ नंतर प्रथमच पाणी आणल्याने ते पाणीपुत्र म्हणून, तर पवार भूमिपुत्र म्हणून प्रचारात जोरात रंगत भरली आहे.
छगन भुजबळ
बलस्थाने
मतदारसंघात केलेली विकासकामे
मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करून मतदारसंघात आणलेले पाणी
अडचणीत पक्ष न सोडता शरद पवारांची केलेली सोबत
विकासाला निधी आणण्यासाठी सरकारदरबारी असलेले वजन
कमजोरी
पाहुणा उमेदवार असल्याने विरोधक आक्रमक
१५ वर्षांत येथील पाणीटंचाई सोडवण्यात आलेले अपयश
जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश
मराठाविरोधी नेते अशी प्रतिमा
संभाजी पवार
बलस्थाने
माजी आमदार मारोतराव पवार यांचे असलेले वर्चस्व
भूमिपुत्र हवा... या मुद्द्यावर तयार झालेले वातावरण
राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदेंसह सर्व प्रमुख नेत्यांनी भुजबळ हटावसाठी दिलेला पाठिंबा
कमजोरी
आक्रमक स्वभावामुळे काही नेते, कार्यकर्त्यांची नाराजी
पद नसल्याने कामे करताना आलेल्या मर्यादा
पदांची वाटणी करताना समर्थकांनाच पसंती
स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी