Vidhan Sabha 2019 : मी मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा - पंकजा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

‘मी मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे; तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय आपण तसा दावाही केला नाही,’’ असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा 2019 : औरंगाबाद - ‘मी मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे; तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय आपण तसा दावाही केला नाही,’’ असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. 

पत्रकार परिषदेत मुंडे यांनी कामांची यादीच समोर ठेवली. त्यानंतर पत्रकारांनी आपण मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी होत आहे? या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ‘‘सावरगाव येथे पक्षनेतृत्वासमोर काही कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्‍त केल्या. मात्र, आपण त्या कार्यकर्त्यांना ओळखत नाही.’’ परळीमध्ये काय सुरू आहे?’ असा प्रश्‍न मुंडे यांना विचारला असता, ‘‘परळीत बहिणीचीच हवा आहे,’’ असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर ‘निवडणूक एकतर्फी होईल का?’ असा प्रश्‍न उपस्थित केला असता, ‘‘चांगली फाइट होईल,’’ असे त्यांनी बोलून दाखविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 chief minister Activists pankaja munde politics