Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री हिंदीतली भाषणं मराठीत करतात : सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

केंद्रातील भाजपचे नेते हिंदीत जी भाषणं करतात; तीच भाषणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतून करीत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. ‘साम’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

विधानसभा 2019 : मुंबई - केंद्रातील भाजपचे नेते हिंदीत जी भाषणं करतात; तीच भाषणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतून करीत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. ‘साम’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे. फडणवीस सरकारने पाच वर्षांत काय केले हे त्यांनी सांगायला हवं. पण ते भारत पाकिस्तान, ३७० कलम यांसारख्या भावनिक मुद्‌द्‌यावरच भाषणं करत आहेत.

बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रस्ते खड्‌डेमुक्‍त झालेले नाहीत. उद्‌योग बंद पडत आहेत. अनेक भागात दुष्काळाचे तर काही भागात महापुराचे संकट आहे. जनता त्रस्त असताना सरकारने त्यावर केलेल्या उपाययोजना सांगायला हव्यात. पण, ते या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करताना अपयशी झाले असल्याने त्यांना अशाप्रकारच्या विषयांचा आधार घ्यावा लागतो आहे, असे सुळे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Chief Minister Hindi speech Marathi Supriya sule politics