Vidhan Sabha 2019 : सहा लाख कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोग सज्ज

voting
voting

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी (ता. २१) मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील सहा लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राबता असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, जास्तीत जास्त मतदानासाठी आयोगाने मतदारांना आवाहन केले आहे.

आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असते. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोग सक्रिय झालेला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे.

राज्यातील स्थिती
८,९८,३९, ६०० एकूण मतदार
४,६८,७५,७५० पुरुष मतदार 
४,२८,४३,६३५ महिला मतदार
३ लाख ९६ हजार दिव्यांग मतदार 
१,१७,५८१ सर्व्हिस मतदार
२, ६३४ तृतीयपंथी मतदार
९६, ६६१ एकूण मतदान केंद्रे
९५,४७३ मुख्य केंद्रे
१,१८८ सहायक केंद्रे
३५२ सखी केंद्रे

मतदान यंत्रे
१, ७९, ८९५ एकूण यंत्रे 
१,२६, ५०५ कंट्रोल युनिट
१,३५,०२१ व्हीव्हीपॅट यंत्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com