Vidhan Sabha 2019 : सरकारच्या भ्रष्टाचाराची कोट्यवधींची उड्डाणे - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj-chavan
Prithviraj-chavan

विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या कारभारात ७३ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार या सरकारने केला, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.

राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये ७३ हजार कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाले आहेत. मोदी सरकारच्या काळात बॅंकांचे गैरव्यवहार सात पटीने वाढले आहेत.

‘पीएमसी’ बॅंक गैरव्यवहारामुळे ठेवीदारा संकटात आले आहेत. बॅंक नियमांचे उल्लंघन करून एका उद्योगपतीला ७३ टक्के कर्जवाटप केले तेव्हा राज्याचे आणि केंद्राचे सहकार खाते काय झोपले होते का? भ्रष्टाचाऱ्यांचा सरकारमधील उच्च पदस्थांशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांची नावे जाहीर करावीत व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. जनतेला भाजपचे खरे रूप कळाले असून, या निवडणुकीत भाजपला पराभूत करून मतदार पुन्हा काँग्रेस आघाडीचे सरकार आणेल, असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com