Vidhan Sabha 2019 : प्रचाराची लड पेटली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची लड आज पेटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांमुळे पॉलिटिकल फिव्हर शिगेला पोचला होता.

विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची लड आज पेटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांमुळे पॉलिटिकल फिव्हर शिगेला पोचला होता.

महायुतीचे पैलवान दंड थोपटून उभे आहेत; पण समोर लढायलाच कोणी नाही. राहुल गांधींनी पराभव मान्य केला असून, राष्ट्रवादीची अवस्थाही बिकट आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
शिरपूर येथील सभेत

आम्ही राममंदिराबरोबरच गावागावांमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी उद्योगमंदिरेही उभारणार आहोत. ही धर्मांधता नाही तर वचनबद्धता आहे. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
श्रीरामपूर येथील सभेत

मागील पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, केवळ ३१ टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, उद्योगधंदे बंद पडल्याने युवक बेरोजगार, नवीन रोजगारनिर्मिती नाही, अकोल्यासह राज्यातील कापड गिरण्यांचे पुनरुज्जीवन नाही, सर्वच अडचणीत असतील, तर हे सरकार कुणासाठी चालवता?
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
वाडेगाव येथील सभेत

राज्यात पाच वर्षे सत्ता भोगलेल्या शिवसेनेला शेतकरी, महागाई, बेरोजगारीबाबत काहीच करता आले नाही. आता कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन देणारे शिवसेना नेतृत्व पाच वर्षे झोपा काढत होते का? माझ्या अश्रूंबाबत बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी युती टिकवण्याकडे लक्ष द्यावे.
- अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
पुण्यातील मेळाव्यात

दिवसभरात

  • पुण्यातील ‘राज’सभा पावसामुळे रद्द
  • तेजस ठाकरे नगरच्या सभेत व्यासपीठावर
  • राष्ट्रवादीची मुंबईसाठी समन्वय समिती
  • कल्याण पूर्वमध्ये युतीच्या नेत्यांचे बंड
  • सुशीलकुमार शिंदेच थकल्याची अजित पवारांची टीका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Politics Promotion