
‘देशाची व राज्याची जी परिस्थिती झालेली आहे, ती पाहिल्यानंतर सत्तेत गेल्याशिवाय मार्ग नाही, लोकांचे प्रश्न सत्ता असल्याशिवाय सोडवू शकणार नाही, त्यामुळे सत्तेत जाण्याचा चंग बांधलेला आहे,’’ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
विधानसभा 2019 : बारामती - ‘देशाची व राज्याची जी परिस्थिती झालेली आहे, ती पाहिल्यानंतर सत्तेत गेल्याशिवाय मार्ग नाही, लोकांचे प्रश्न सत्ता असल्याशिवाय सोडवू शकणार नाही, त्यामुळे सत्तेत जाण्याचा चंग बांधलेला आहे,’’ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
बारामतीचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ‘‘बारामती जिल्हा व्हावा न व्हावा याची चर्चा मी गेली वीस वर्षे ऐकतोय. पाणी कुठून कसे पळवले गेले, याचीही मला जाणीव आहे. तरीही ४२ गावे पाण्यापासून वंचित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सत्तेत येवो अथवा न येवो या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाहीही आंबेडकर यांनी दिली.