Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

लक्षवेधी लढती 

  • वरळी - आदित्य ठाकरे (शिवसेना) वि. सुरेश माने (राष्ट्रवादी)
  • बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी) वि. गोपीचंद पडळकर (भाजप) 
  • कोथरूड - चंद्रकांत पाटील (भाजप) वि.किशोर शिंदे (मनसे)
  • द. कऱ्हाड - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) वि. अतुल भोसले (भाजप)
  • परळी - पंकजा मुंडे (भाजप) वि. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
  • येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी) वि. संभाजी पवार (शिवसेना)
  • शिर्डी - राधाकृष्ण विखे (भाजप) वि. सुरेश थोरात (काँग्रेस) 
  • नालासोपारा - प्रदीप शर्मा (शिवसेना) वि. क्षितिज ठाकूर (बविआ)

विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Shivsena BJP Congress MNS NCP Politics