Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचा आज ‘वचननामा’

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

‘वचननाम्या’त काय असेल?

  • कोस्टल रोड पूर्ण करणार
  • अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि डॉ. आंबेडकर यांचे स्मारक पाच वर्षांत पूर्ण करणार
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कृषीमालाला हमीभाव
  • ‘आरे’तील वृक्षतोडीच्या बदल्यात अन्य ठिकाणी झाडे लावणार
  • खाजगी उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण

विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ शनिवारी (ता. १२) सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर प्रकाशित होणार आहे. या ‘वचननाम्या’त राज्यातील गरीब जनतेला १० रुपयांत थाळी आणि एक रुपयात आरोग्य तपासणीचा समावेश असेल.

या ‘वाचनानाम्या’त आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याची शक्‍यता आहे. ८ ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा ‘अजेंडा’ उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला होता. त्याचे प्रतिबिंब वाचनाम्यात उमटण्याची शक्‍यता आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. सोबतच युतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 shivsena promise