esakal | निवडणुकांच्या पाश्वभूमीवर काय म्हणतोय 'सट्टाबाजार' ?
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकांच्या पाश्वभूमीवर काय म्हणतोय 'सट्टाबाजार' ?
  • राज्यातल्या निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा
  • महायुतीला 200 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज
  • सट्टेबाज म्हणातात आघाडीला 55 ते 60च जागा मिळणार

निवडणुकांच्या पाश्वभूमीवर काय म्हणतोय 'सट्टाबाजार' ?

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

जसजशी निवडणूक जवळ येतीय तसतसा विधानसभेचा प्रचार शिगेला जाताना दिसतोय. यात सट्टेबाजही मागे नाहीत. राज्यातल्या निवडणुकीवर एक दोन नव्हे तर तब्बल 30 कोटींचा सट्टा लागलाय. सट्टेबाजारात महायुती आघाडीवर असून त्यांना 200हून अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र 220चा आकडा गाठताना युतीची दमछाक होईल असाही होरा आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जेमतेम 55 ते 60 जागांची मजल गाठेल, असाही एक अंदाज आहे. तर एमआयएम आणि मनसे यांना प्रत्येकी एक किंवा दोन जागांवर समाधान मानावे लागेल, असा सट्टेबाजांचा होरा आहे.  

सट्टाबाजारातल्या अंदाजानुसार

  • भाजप : १२० जागा, १.६० रुपये भाव 
  • शिवसेना : ८५ जागा, ३ रुपये भाव 
  • काँग्रेस : ३० जागा, २.५० रुपये भाव 
  • राष्ट्रवादी : ३० जागा, ३.५० रुपये भाव 

सुत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीच्या सट्टेबाजीसाठी विशेष पोर्टल तयार करण्यात येतात. विशिष्ट यूजर आयडी आणि पासवर्ड सट्टेबाजांना कळवले जातात. हा तपशील व्हॉट्ऍपद्वारे संबंधित व्यक्तीला पाठवला जातो. त्यानंतर मोबाईल ऍप अथवा पोर्टलद्वारे सट्टा लावला जातो.

पैसे घेणारा आणि देणारा एकमेकांच्या संपर्कात नसल्यामुळे सरकारी यंत्रणांना सट्टेबाजांपर्यंत पोहचणं शक्य होत नाही. त्यामुळेच सट्टेबाजांचं चांगलंच फावतंय. 

WebTitle : maharashtra vidhansabha election and betting market insights

loading image