esakal | Maharashtra: गावातील रस्त्यांसाठी अर्थमंत्र्यांना भेटू : पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पाटील

गावातील रस्त्यांसाठी अर्थमंत्र्यांना भेटू : पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अर्थसंकल्प मतदारसंघाच्या नजरेतून कसा अभ्यासायचा, या विधीमंडळ कार्यशाळेत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गावातील रस्ते बांधणीसाठी निधी मिळवायचा कसा, असा प्रश्न विचारला. राज्याचा अर्थसंकल्प सात वेळा सादर करणाऱ्या, सध्या जलसंपदा खाते सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांनी गावात रस्ते बांधण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन घेणे हे फार मोठे आव्हान असून आपण त्यासाठी अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेवू, असे त्यांना सांगितले. कोरोनामुळे दोन वर्षे अत्यल्प कालावधीची अधिवेशने होत असताना अभ्यासवर्गाला आमदार मोठया संख्येने उपस्थित होते.

अंबादास दानवे, यामिनी जाधव, समाधान अवताडे यासह नव्या आमदारांनी नेत्यांना प्रश्नही विचारले. त्यातून रस्त्यांसाठी तरतूद, मतदारसंघासाठी देण्यात येणारी अनुदाने असे खरे प्रश्न समोर आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यशाळेचे उद्धाटन केले. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांनी एकत्र यावे, असेही ते म्हणाले.

loading image
go to top