दुपारी चटका; रात्री गारठा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - राज्यात गेल्या आठवड्यात सरासरीपेक्षा वाढलेला कमाल तापमानाचा पारा रविवारी पुन्हा खाली घसरला आहे. शहरात दुपारी उन्हाचा चटका लागत असून, रात्री मात्र गारठा वाढला आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरी इतका (31.6 अंश सेल्सिअस) होता. राज्यात नाशिक येथे सर्वांत कमी म्हणजे 8.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. 

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव अद्यापही कायम आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात रात्री गारठा जाणवतो. शहरात किमान तापमानाचा पारा 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदला गेला. 

उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे विदर्भ आणि पश्‍चिम मध्य प्रदेशाच्या भागात एकत्र येत आहेत. त्यामुळे त्या परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारा महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. 

शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असेही सांगण्यात आले. 

Web Title: maharashtra weather