राज्यात उष्णतेची लाट; अकोल्यात आज उच्चांकी तापमानाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather

राज्यात उष्णतेची लाट; अकोल्यात आज उच्चांकी तापमानाची नोंद

राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) काही दिवसांपूर्वीच वर्तवला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार अनेक ठिकाणी उष्णता वाढली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अनेक स्थानकांवर आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं. आयएमडीच्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट जाणवली. तसंच अकोल्यात आज आज 18 मार्च रोजी सर्वाधिक 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिली आहे. तसंच त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील सर्वांना केलं आहे.