Weather Update : मॉन्सून दोन दिवसांत परतणार

मॉन्सूनने यंदा २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागांतून परतीचा प्रवास सुरू
Maharashtra Weather Update rain forecast Monsoon return in two days
Maharashtra Weather Update rain forecast Monsoon return in two dayssakal

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. रविवारपर्यंत (ता.२३) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. गुरूवारी (ता. २०) देशाच्या बहुतांश भागांतून परतलेल्या मॉन्सूनने शुक्रवारी (ता. २१) संपूर्ण छत्तीसगड, ओडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागांसह आंध्र प्रदेशच्या काही भागातून काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

मॉन्सूनने यंदा २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागांतून परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात मॉन्सूनची वाटचाल अडखळत सुरू आहे. तब्बल महिनाभर वाटचाल केल्यानंतर गुरुवारी (ता. २०) मॉन्सूनने संपूर्ण झारखंड, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील राज्य, ओडिशाच्या बहुतांश भाग, विदर्भ, छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून परतत बहुतांश देशातून माघार घेतली.

दरम्यान, मराठवाड्यात परतीच्या पावसाचे थैमान सुरूच असून बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर व आज झोडपून काढले. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला.

विदर्भाच्या बहुतांश भागांचा निरोप

शुक्रवारी (ता. २१) परतीची वाटचाल सुरू ठेवत मॉन्सूनने संपूर्ण छत्तीसगड, ओडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागांसह आंध्र प्रदेशाच्या काही भागांतून मुक्काम हलवला आहे. डहाणू, बुलडाणा, काकीनाडा, रामगुंडम पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. रविवार (ता.२३) पर्यंतच्या २४ तासांत मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com