विधीमंडळात मुख्यमंत्र्यांचे स्वागत विरोधकांच्या घोषणांनी

Maharashtra
Maharashtra

मुंबई : मुंबईत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज (सोमवार) सुरवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. विधानभवनात आगमन केल्यावर विरोधकांनी पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे मंत्री, आमदार यांचे स्वागत विरोधकांच्या घोषणांनी केले.

हिवाळी आधिवेशानाचा हा पहिलाच दिवस आहे. कामकाज 9 दिवस चालणार आहे. या दरम्यान मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण, दुष्काळ, कर्जमाफी या मुद्द्यांनी अधिवेशनात जोरदार चर्चा होणार आहे. आज त्याची झलक पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली.

दुष्काळ निवारणाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही. शेतकरी कर्जमाफीचे तीनतेरा वाजले. मराठा आरक्षणाबाबत अजूनही संदिग्धता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 'वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

मराठा समाजाला ओबीसीच्या उपप्रवर्गात आरक्षण द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. स्वतंत्र कोट्यात आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, असा त्यांनी दावा केला आहे.

मुस्लिम आरक्षणावरुन एमआयएम आक्रमक
आमच्या सेलिब्रेशनचीही तारीख सांगा, अशा मागणीचे पोस्टर एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी विधानभवन परिसरात झळकावले.  मराठा समाजासोबत मुस्लिमांच्या आरक्षणासाठीही पावले उचला, अशी मागणी त्यांनी केली. 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार राहा, असे विधान मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाला उद्देशून केले होते. त्या पार्श्वभूमीवर एमआयएमनेही पोस्टर झळकावत आपली मागणी लावून धरली आहे.

ओला-उबरवरुन विद्या चव्हाणांनी रावतेंना रोखलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विधानभवनात प्रवेश करतानाच रोखले. विद्या चव्हाण यांनी रावतेंना ओला-उबर संपाबाबात जाब विचारला. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com