युवक काँग्रेस वर्धापन दिवस साजरा करणार नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सध्या राज्यातील पूरस्थिती गंभीर असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस उद्या (ता.09) असणारा वर्धापन दिवस साजरा करणार नाही. परंतु, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत गोळा करणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

मुंबई : सध्या राज्यातील पूरस्थिती गंभीर असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस उद्या (ता.09) असणारा स्थापना दिवस साजरा करणार नाही. परंतु, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील खासकरून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा आणि पूराचा मोठा फटका बसला आहे. तेथिल लोक पाण्यात अडकून आहेत. त्यांना मदतीची गरज असून महाराष्ट्रातील अन्य भागांतील लोकांकडून मदत गोळा करून पूरस्थितीचा फटका बसलेल्या लोकांना मदत पोहोचविण्याचे काम युवक काँग्रेस करणार आहे.
 

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन सर्वांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहनही यावेळी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Youth Congress will not celebrate its foundation day tomorrow