Maratha Kranti Morcha : राज्यभरात 'बंद'; सार्वजनिक वाहतूक, इंटरनेट सेवेवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे.

'बंद'च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या सेवेवर परिणाम झाला आहे. पुण्यातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्ा आहेत. स्वारगेट व शिवाजीनगर या दोन मुख्य स्थानकांमधून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एसटीची नासधुस होऊ नये, म्हणून सर्व बस स्वारगेट स्थानकात उभ्या करण्यात आल्या आहेत.

एरवी गजबजलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून शुकशुकाट आहे. तसेच, आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्येही तुरळक वाहतूक आहे. 

हिंगोलीमध्ये काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सेनगाव येथील तोष्णिवाल कॉलेज कॅम्पसमध्ये असलेली मिनी स्कूल बस पेटवून देण्यात आली. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आग शमविली. लातूर जिल्ह्यात काल मध्यरात्री साखरा पाटी येथे टायर जाळण्यात आले. 

सांगलीमध्ये आज सकाळपासून बससेवा, बाजार पेठ आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यभरात 'बंद'
पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली
हिंगोली: महाविद्यालयाची स्कूल बस पेटवली
 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'
परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर
पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद
भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद
नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा
हिंगोलीत मोठा प्रतिसाद
लातुरात मोटारसायकल रॅली
जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम

Web Title: #MaharashtraBandh Internet suspended in Maharashtra