
महाराष्ट्राच्या नारीशक्तीचा देशात डंका! सर्वाधिक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजिका आपल्या राज्यात;
छत्रपती संभाजीनगर : देशभरात सूक्ष, लघु, मध्यम उद्योग विकासासोबत रोजगार देण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. यात महिला पुढे येत असून देशात २७ लाख १७ हजार ९१ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग महिलांच्या नावे नोंदणीकृत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ५ लाख ५२ हजार १८० सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजिका महिला आहे.
देशात १.४७ कोटी एमएसएमई नोंदणीकृत असून यामध्ये महिलांचा वाटा हा १९ टक्के आहे.
सगळ्यात जास्त संख्या ही सूक्ष्म उद्योगांची
उद्योगिक विकासात सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग महत्वाची भूमिका पार पाडतात. यात स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासोबत रोजगारांच्या अनेक संधी आहे. त्यामुळे सूक्ष्म, लुघ उद्योगांची संख्या वाढत आहे. मागील काही वर्षात महिलांच्या नावाने नोंदणीकृत होणाऱ्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची संख्या वाढत आहे.
देशाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महाराष्ट्र क्रमांक एकवर असून ५ लाख ५२ हजार १८० सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग महिलांच्या नावाने नोंदणीकृत झाले आहे. त्या खालोखाल तमिळनाडूत ३ लाख ७६ हजार २३७, उत्तरप्रदेश १ लाख ८० हजार ८१, कर्नाटक १ लाख ७३ हजार ४९२, राजस्थान १ लाख ३७ हजार ६७७, गुजरात १ लाख ६२ हजार ११३, आंधप्रदेश १ लाख ९ हजार ६७६ या राज्यांचे नंबर लागतो. यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही सूक्ष्म उद्योगांची आहे.
क्रीडीट गारंटी योजनेत महिला उद्योजकांना कर्ज
क्रीडीट गारंटी फंड्स फॉफ माइक्रो अँण्ड स्मॉल एंटरप्राइजेज (सीजीजीएमएसई) च्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना क्रेडीट गारंटी योजनेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. यात महिला उद्योजकांना ही कर्ज दिले जाते. यामध्ये २००० पासून ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत देशात १४ लाख २४ हजार ७९ महिलांच्या उद्योगांना ५८ हजार २३७ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील ६३ हजार ७९४ उद्योगांना ६ हजार ५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
९ मार्च २०२३ पर्यंत महिलांच्या नावे असलेले सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग
राज्य सूक्ष्म लघु मध्यम एकूण
महाराष्ट्र ५,४५,४४० ६,३८६ ३५४ ५,५२,१८०
तमिळनाडू ३,७०,२१० ५,७५६ २७१ ३,७६,२३७
उत्तरप्रदेश १,७५,६६५ ४,२३३ १८३ १,८०,०८१
कर्नाटक १,६९,८५५ ३,४७५ १६२ १,७३,४९२
राजस्थान १,३४,२७६ ३,२६६ १३५ १,३७,६७७
गुजरात १,५८,०४६ ३,९०८ १५९ १,६२,११३
आंध्रप्रदेश १,०७,२१० २,३५५ १११ १,०९,६७६
अरुणाचल प्रदेश २,०५२ ३८ ३ २,०९३
आसाम ५५,८५५ ६०९ २६ ५६,४९०