Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Gandhi Passes Away

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे आज (मंगळवार) अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ८९ वर्षीय लेखक आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआयला सांगितले.

अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी नंतर त्यांच्या आजोबांचा मार्ग अवलंबला आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम केले.

अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी हे प्रमुख आहेत. अरुण गांधी १९८७ मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्याने आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.