जीवनरक्षा पदकविजेत्यांत महाराष्ट्रातील चार जण

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

नवी दिल्ली- माणुसकीचे दर्शन घडविण्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जीवनरक्षा पदकांसाठी महाराष्ट्रातील चौघांची निवड करण्यात आली आहे. कारागृह सेवेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दलही महाराष्ट्रातील तीन जणांची या संदर्भातील सेवापदकांसाठी निवड करण्यात आली आहे.

जीवनरक्षा पदकांचे तीन प्रकार आहेत. सर्वोत्तम, उत्तम आणि जीवनरक्षा पदक. त्यातील उत्तम जीवनरक्षा पदकासाठी महाराष्ट्राच्या गोविंद लक्ष्मण तुपे यांची निवड करण्यात आली आहे, तर जीवनरक्षा पदकासाठी तेजेश ब्रिजलाल सोनावणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि नीलकांत रमेश हरिकांत्रा यांची निवड करण्यात आली आहे. पदक, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तिपत्रक आणि रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कारागृह सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार म्हणून सेवापदक दिले जाते. त्यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश झालेला आहे. त्यात रमेश रघुनाथ शिंदे (हवालदार येरवडा कारागृह), सुभाष ज्ञानोबा कुऱ्हाडे (जेल शिपाई, येरवडा कारागृह) आणि शिवाजीराव बाबूराव पाटील (हवालदार, कोल्हापूर केंद्रीय कारागृह) यांचा समावेश आहे.

Web Title: Mahrashtra : three peroson national award