Amruta Fadnavis News: चतुर्वेदी- अमृता फडणवीस वादात महुओ मोईत्रांची एंट्री; म्हणाल्या औकात शब्द वापरणं म्हणजे शुद्ध...| Mahuo Moitra's Entry in Chaturvedi-Fadnavis Controversy; Devendra Fadnavis | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahuo Moitra, Priayanka 
Chaturvedi, Amruta Fadnavis

चतुर्वेदी- अमृता फडणवीस वादात महुओ मोईत्रांची एंट्री; म्हणाल्या 'औकात' शब्द वापरणं म्हणजे शुद्ध...

Amruta Fadnavis News- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्याचा चौथा दिवस आहे. यावेळी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला.

याचा वाद आता पेटला असून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट रिट्विट करत थेट त्यांची औकातच काढली. यात आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांची एंट्री झाली आहे.

अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट करत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, मॅडम चतुर आधी तुम्ही खोटा दावा केला होता की मी AxisBank ला फायदा करून दिला.

आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर, जर कोणी तुमच्याकडे पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाकडून मदत केली असती. तीच तुमची औक़ात आहे.

यावर महुआ मोईत्रा यांनी ट्विट करत म्हटलं की, मी प्रियांकाशी सहमत आहे. काही स्त्रिया "औकत" सारख्या कमी बजेटच्या हिंदी चित्रपटातील डायलॉग वापरतात हे आश्चर्यकारक आहे!! मला असं म्हणायचे की हे वास्तविक जीवनातही असे शब्द वापरतात.

औकात शब्द वापरणे म्हणजे वेडगळपणाच, असा खोचक टोलाही मोईत्रा यांनी अमृता फडणवीस यांना लगावला..