लोक माझे सांगाती... 

मंजूषा कुलकर्णी 
सोमवार, 4 जून 2018

"लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद यशवंतराव चव्हाणांकडे येईल, अशी भावना देशभर होती. मात्र, चव्हाण साहेबांमधल्या अवास्तव सौजन्यामुळे त्यांची संधी गेली. 1979 मध्ये जनता सरकार कोसळल्यावर ही संधी पुन्हा आली होती.

"लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद यशवंतराव चव्हाणांकडे येईल, अशी भावना देशभर होती. मात्र, चव्हाण साहेबांमधल्या अवास्तव सौजन्यामुळे त्यांची संधी गेली. 1979 मध्ये जनता सरकार कोसळल्यावर ही संधी पुन्हा आली होती. राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापण्यासाठी तीन दिवसांची मुदतही दिली होती. आधी सरकार स्थापन करा, बहुमत होईलच, असे आबासाहेब कुलकर्णी, वसंतदादा पाटील, आबासाहेब शिंदे व माझे मत होते. मात्र चव्हाण साहेबांनी राष्ट्रपतींना कळविले, की सरकार स्थापन करण्याएवढा आवश्‍यक पाठिंबा आमच्यापाशी नाही. त्यानंतर राष्ट्रपतींनी माझ्याकडे ""तुझा नेता सरकार बनवण्याची संधी का दवडतो आहे? अशी विचारणा केली होती,'' अशी राजकीय कारकिर्दीतील आठवण ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "लोक माझे सांगाती...' या आत्मकथेत दिली आहे. 1991 मध्ये स्वत: शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. त्या वेळी गांधी घराण्याशी घट्ट नाते सांगणाऱ्या चौकडीने पवार यांचे पंतप्रधानपद कसे हिसकावले, याची माहिती यात आहे. देशाच्या व राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी या आत्मकथेतून प्रकाशात आल्या आहेत. 

 

Web Title: Manjusha Kulkarni her artical Lok maze sangati