
मृग नक्षत्र सुरू; 12 तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस
Monsoon Update : आतापर्यंत मॉन्सूनने (Monsoon) अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत मान्सून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोमवारी मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती दिसून आली आहे. मॉन्सूनची उत्तर सीमा रविवार प्रमाणेच अलिबाग, पुणे, करमाळा, सोलापूर जिल्ह्यात असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
उत्तर महाराष्ट्र ते केरळ किणारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाची पट्टा अजून कायम आहे. मात्र, कोकण गोव्यावर चक्रीय चक्रवात आता विरले असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. मॉन्सून जरी दाखल झाला, तरी पुढील तीन चार दिवस त्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारी (ता.११) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १२ ते १७ जून दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेष करून घाटमाथ्यावर जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?
आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मृग नक्षत्र सुरू झालं आहे. अर्धा महाराष्ट्रात पेरणी सुरु झाली आहेत. तर विदर्भातील बळीराजाही मॉन्सूनच्या प्रतिक्षेत आहे. मान्सून महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाल्याने विदर्भात नेमका केव्हा येईल, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मॉन्सूनच्या विदर्भातील संभाव्य आगमनाबद्दल हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असला तरी विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाला आणखी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.
हेही वाचा: न्यूड फोटो FBवर लीक, iPhone ला मोजावे लागतायेत कोट्यवधी रुपये
मॉन्सूनची हवा :
- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा,कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि दक्षिण रायगड जिल्ह्यांत मॉन्सूनचा मुक्काम वाढला
- बंगालमधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १२ ते १७ तारखेच्या दरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता
- मॉन्सूनची प्रगती रोडावण्याची शक्यता
- मॉन्सून दाखल झाला तरी तुलनेने पाऊस कमी दिसतोय
हेही वाचा: स्वप्नात दिसतात मृत लोक; रहस्यमय आजारानं नागरिक त्रस्त
Web Title: Mansoon Update Mansoon Maharashtra News Rain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..