शाश्वत व विषमुक्त शेतीचा मिळणार मंत्र

शाश्वत व विषमुक्त शेतीचा मिळणार मंत्र

बारामती - तापमानातील तीव्र चढउतार, दुष्काळी स्थिती यामुळे संकटात सापडलेल्या शेती व शेतकऱ्यांसाठी अत्यल्प पाणी व मनुष्यबळात शाश्वत व विषमुक्त शेतीचा मंत्र यंदा कृषिक प्रदर्शन देणार आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील ११० एकर क्षेत्रात पिकांची जिवंत प्रात्यक्षिके असलेले हे प्रदर्शन येत्या १७ ते २० जानेवारीदरम्यान शारदानगर (बारामती) येथे होणार आहे.

ट्रस्टमार्फत आयोजित होणाऱ्या या चौथ्या कृषिक प्रदर्शनाची ‘दुष्काळ व्यवस्थापन’ ही या वर्षीची संकल्पना आहे. कमी पाण्यात तग धरू शकणाऱ्या जर्मनी, नेदरलॅण्ड, जपान, इस्राईल, थायलंड, युक्रेन, तैवान, चीन, बेल्जियम, अमेरिका या देशांतील फुलपिके, भाजीपाल्याच्या वाणांची उगवण ते फळापर्यंतची स्थिती शेतकऱ्यांना येथे अभ्यासता  येईल. 

या देशांतील खते, औषधांचे नवे संशोधनही पाहता येईल. भेंडीपासून वांगी-भोपळ्यापर्यंत व झेंडूपासून शेवंतीपर्यंत विविध भाजीपाला, पालेभाज्या, फुलपिकांचा प्रत्यक्ष अभ्यास येथे शेतकऱ्यांना  करता येईल.  

हिवाळ्यात आपल्याकडे भेंडी येत नाही. मात्र, वेगवेगळे तंत्र वापरून बिगर हंगामी पिके घेता येतात, याचाही मंत्र येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीतून दिसेल. याखेरीज भुसार पिकांसाठी ठराविक तणनाशके आतापर्यंत होती, मात्र आता नव्याने उपलब्ध होत असलेली प्रभावी तणनाशके व त्यांचा परिणामही याची डोळा शेतकऱ्यांना अभ्यासता येईल. 

सेंद्रिय, जैविक शेतीला महत्त्व
या वर्षीच्या कृषिकमध्ये प्राधान्याने सेंद्रीय, जैविक शेतीला महत्त्व देण्यात आले असून सेंद्रिय बियाण्यांपासून ते जैविक खत व्यवस्थापन व काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अभ्यासता येईल. करार शेतीच्या कंपन्याही यामध्ये सहभागी असून, त्यांच्या बियाण्यांतून आलेल्या उत्पादनांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके येथे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com