Mantrimandal
Mantrimandal

मंत्रिमंडळातील नवे चेहरे

राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी) 
माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे.

जयदत्त क्षीरसागर 
बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व संघटन कौशल्य. 

प्रा. तानाजी सावंत (अभियंता)
शिक्षण संस्थाचालक. साखर कारखानदार. पहिल्यांदाच विधान परिषदेतून आमदार. ‘शिवजल क्रांती’चे प्रणेते. सामूहिक विवाह सोहळ्यातून शेकडो जोडप्यांचे मोफत विवाह. उद्धव ठाकरे यांचा विश्‍वासू.

आशिष शेलार (वकील)
भाजपामधील युवा चेहरा. निष्ठावंत कार्यकर्ता. अभ्यासू मांडणी व पक्ष संघटनात हातखंडा. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द. अमित शहा यांचे विश्‍वासू म्हणून ओळख.

डॉ. संजय कुटे (वैद्यकीय पदवीधर)
बुलडाणा जिल्ह्यातील तरुण नेतृत्व. सलग तीन वेळा विधानसभेत आमदार. विदर्भातल्या प्रश्‍नांची उत्तम जाण व मांडणी. जलसिंचनात काम. मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय.

डॉ. अनिल बोंडे (वैद्यकीय पदवीधर)
मोर्शी मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग तीन वेळा विधानसभेवर. शेती प्रश्‍नांची उत्तम जाण. विधानसभेत प्रभावी मांडणी. कुणबी समाजातले नेतृत्व.

संजय ऊर्फ बाळा भेगडे
मावळ (जि. पुणे) भागातील भाजपचा निष्ठावंत चेहरा. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय. शेतकरी आंदोलनात सतत सक्रिय. मावळच्या पाणी आंदोलनातील परिचीत नेतृत्व. 

डॉ. सुरेश खाडे (आयुर्वेद पदवीधर)
मिरज मतदारसंघातून भाजपचे आमदार. निष्ठावंत मागासवर्गीय चेहरा. उद्योजक. 

अतुल सावे 
औरंगाबादमधून पहिल्यांदाच विधानसभेत. काँग्रेसचे नेते राजेंद्र दर्डा यांचा पराभव केल्याने चर्चेत. शिवसेनेचे माजी खासदार मोरेश्‍वर सावे यांचे चिरंजीव. चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेदानंतर भाजप प्रवेश. 

अविनाश महातेकर
रिपब्लिकन चळवळीतला निष्ठावंत चेहरा. उत्तम वक्ता. अभ्यासू व्यक्तिमत्त्व. रामदास आठवले यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

डॉ. अशोक उईके (पीएच.डी.)
प्राचार्य म्हणून कारकीर्द. आदिवासी समाजातील चेहरा. यवतमाळ जिल्ह्यातले नवे नेतृत्व. पहिल्यांदाच विधानसभेवर 

योगेश सागर (उद्योजक)
भाजपचे निष्ठावंत. मुंबईतला गुजराती समाजाचा चेहरा. नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत प्रभावी कामगिरी. आक्रमक नेता. 

परिणय फुके
पहिल्यांदाच विधान परिषदेचे सदस्य. नागपूरमधील तरुण चेहरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  जिवलग मित्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com