माळवाडीत तिहेरी हत्याकांड, पुतण्याकडून काकू,भावजय,चुलत भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

इगतपुरीः  माळवाडी (ता.इगतपुरी) खेड ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी  एका तरूणाने धारदार चाकूने निर्दयीपणे आपल्याच कुटुंबातील  तिघांचे खून केले.  या  हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.. घटनेनंतर गावकऱ्यांनी तरूणाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने वातावरण तंग बनले. शिकून नोकरी मिळत नसल्याने सतत डिवचत असल्याने आरोपीने हे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांना सांगितले. 

याबाबतचे वृत्त असे की, सकाळी साडेनऊला  संशयित आरोपी पुतण्या सचिन गणपत चिमटे( वय 23) यांचे चुलत भाऊबंद व शेजारी राहत असलेल्या काकू. हिराबाई शंकर चिमटे ( वय 55 ) या आपल्या नातवासह घरात बसलेल्या होत्या. तर भावजय मंगला गणेश चिमटे ( वय 30 ) ह्या घरामागे केराची टोपली टाकण्यासाठी गेल्या. त्याचवेळी आरोपी सचिन याने मंगला हिस एकटे गाठून धारदार चाकूने गळ्यावर वार केले. मंगला तेथेच खाली कोसळल्या. यावेळी मंगला हिचा मुलगा यश याने आपल्या आईची झालेली हत्या पाहताच घराकडे धाव घेत. आपल्या आजीला सांगितले. तो पर्यंत आरोपीने मंगला हिस घरात ओढत आणले. काकू हिराबाई यांनी त्यास जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हिराबाईच्या गळा आणि मानेवर धारदार चाकूने वार  केला. या वारामुळे हिराबाई कोसळल्या. त्यानंतर आरोपीने आपला मोर्चा पुतण्या रोहित ( वय 4 ) याच्याकडे वळवला. त्यांच्यावरही वार करत त्याची हत्या केली.
यशची सुटका अन् गावकऱ्यांनी पकडले
दुसरा पुतण्या  यश ( वय 6 ) हा घरातून पळून जात असतांना आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. पण  रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजी,आई,भावास पाहून आपला जीव वाचवण्यासाठी त्याने आपला डावा हात पुढे केला.  पळून जात असतांना त्यात तो जखमी झाला.. त्याने आरडाओरड केल्यानंतर   तातडीने लोक जमा झाले. त्यांनी आरोपीस आरोपीस चांगलाच चोप देत घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची गांभीर्य पाहताच सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी  आले. त्यांनी आरोपीस ताब्यात घेत मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठवून दिले.
घटनेची माहिती तालुक्यात पसरताच लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी रुग्णलयात एकाच गर्दी केली, असता पोलिसांनी समन्वयाने नागरिकांस शांततेचे आवाहन करीत जमावास शांत केले. पोलिसांनी आरोपीचे वडील,आई व बहिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 
Web Title: marath news murder,3 dead