आशिया राष्ट्रांत उत्पादित न होणाऱ्या  खाद्यतेलाच्या निर्यातीवर कर लावाः पाशा पटेल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्विकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली. 

श्री. पटेल म्हणाले, की आशिया राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमधील उत्पादनाला आयातकर लावता येत नाही. नेमकी हीच पळवाट शोधून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये सोयाबीन तेलाची आयात करुन निर्यात करण्याचा धंदा काही जणांनी सुरु केला. ही बाब निदर्शनास येताच, मुख्यमंत्र्यांनी आयातकर लावण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधानांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कृषीमंत्री राधामोहन सिंह, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. केंद्राने त्यासंबंधीचे धोरण स्विकारल्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीपेक्षा शंभर रुपये अधिकचा भाव क्विंटलमागे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

केंद्र सरकारने सोयाबीनची क्विंटलचा किमान आधारभूत किंमत 3 हजार 390 रुपये केली आहे. प्रत्यक्षात 3 हजार 900 रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. पण नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याच्या भावाची काय स्थिती राहील अशी चिंता निर्माण झाली होती. अशातच, नव्याने सोयाबीन खरेदीच्या व्यवसायात उतरलेल्या लातूरच्या खासगी कंपनीने सोयाबीनचा क्विंटलचा भाव 3 हजार 550 रुपये असा जाहीर केला आहे.

 किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो हे स्पष्ट झाले आहे. मुळातच, बोंडअळीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरण्याकडे कल वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: marath news pasha patel