रॅनसमवेअरच्या टार्गेटवर "महाराष्ट्र' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई ः रॅनसमवेअरच्या टार्गेटवर महाराष्ट्र असल्याचे चित्र इस्कॅनतर्फे सायबर धोक्‍यांबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पुढे आले आहे. गेल्या महिन्यात सर्वाधिक 56 टक्के रॅनसमवेअरच्या हल्ल्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. 

मुंबई ः रॅनसमवेअरच्या टार्गेटवर महाराष्ट्र असल्याचे चित्र इस्कॅनतर्फे सायबर धोक्‍यांबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पुढे आले आहे. गेल्या महिन्यात सर्वाधिक 56 टक्के रॅनसमवेअरच्या हल्ल्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. 

अहवालानुसार गेल्या महिन्यात रॅनसमवेअरच्या झालेल्या हल्ल्यांची टक्केवारी राज्यनिहाय अशी ः दिल्ली- 13, गुजरात- 12, तेलंगणा- 9, तमिळनाडू- 9. दरम्यान, जगभरात सक्रिय असलेले रॅनसमवेअर हल्ले अनेक वर्षांपासून भारतातही होताहेत. या हल्ल्यांच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा, तर आशियामध्ये तिसरा क्रमांक आहे. इस्कॅनच्या आकडेवारीनुसार जगात गेल्या महिन्यात 20.77 टक्के, तर भारतात 22.94 टक्के हल्ले झाले आहेत. 

नोटाबंदीनंतर देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेची वेगाने प्रगती झाली तरी देशात डिजिटल धोक्‍यांचे नवे मार्ग तयार झाल्याचे रॅनसमवेअरच्या हल्ल्यावरून स्पष्ट होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. विंडोज प्रणालीचे जुने व्हर्जन असलेल्या बॅंका, विमानतळ, दूरसंचारप्रणाली आणि भांडवली बाजार यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर रॅनसमवेअरचा परिणाम दिसून आला. मोबाईल उपकरणे आणि मोबाईल डेटाच्या सहज वापरासोबतच सायबर हल्ल्यांची किंमत चुकवावी लागली. त्यामुळे देशात डिजिटल साक्षरतेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता अभ्यासक अधोरेखित करत आहेत. 

इस्कॅनचा सल्ला 
- सुरक्षा यंत्रणा नियमितपणे अपडेट करा ः तुमची मोबाइल उपकरणे पूर्णपणे अपडेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. जावा स्क्रिप्ट वापरून हा हल्ला करता येऊ शकतो, हे लक्षात आले आहे. त्यामुळे जेव्हा नवे व्हर्जन उपलब्ध असतील, तेव्हा ब्राउजर अपडेट करणे हा मोबाईलसाठी सर्वोत्कृष्ट बचाव आहे. 
- डेस्कटॉप / सर्व्हर ः मायक्रोसॉफ्टने अनिवार्य केल्यानुसार विंडोज मशिन्सवर "अँटीव्हायरसने रजिस्ट्री की' लागू केली असल्याची खात्री करावी. त्यामुळे अँटीव्हायरसप्रणाली तपासून घेण्यात येऊन मायक्रोसॉफ्टने पुरवलेल्या पॅचेसशी सुसंगत आहे का, याची खात्री होते. 
- ऍप्लिकेशन डाउनलोड करताना सजग राहा ः इंटरनेटवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करणे टाळा. तुमच्या उपकरणात उपलब्ध असलेल्या गुगल प्लेस्टोअर अथवा ऍप स्टोअरचा वापर करा. 
- बॅकअपची खात्री करा ः उपकरण / सिस्टिम फॉरमॅट करण्यापूर्वी नेहमी त्यातील डेटाचा बॅकअप घ्या. 
- तुमचे उपकरण अपग्रेड करा ः अनेकदा उपकरणातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जुने झाल्यानंतर मोबाईलला अपडेट्‌स येत नाहीत. कंपन्या सतत नव्या सुरक्षा पॅचेसचा वापर करून मोबाइल उपकरणे आणि सिस्टिमचे व्हर्जन अपग्रेड करत असतात. 

 

Web Title: marath news RANSAMEWARE ATTACK