'एमपीएससी'साठी जाहिरात; मराठा समाजासाठी जागा राखीव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

महाराष्ट्र सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. सरकारने नुकतीच मेगाभरती जाहीर केली होती. या मेगाभरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, हे यापूर्वीच जाहीर केले होते.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली असून, मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. सरकारने नुकतीच मेगाभरती जाहीर केली होती. या मेगाभरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, हे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आता एमपीएससी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 342 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी पदासाठी 4 जागा, पोलिस उप अधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदासाठी 3, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) 1, तहसिलदार 6, उपशिक्षण अधिकारी 2 अशी पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. 

Web Title: Maratha community reservation in MPSC advertisement