मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा

बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. 

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. 

सोलापूर जिल्हा दूध योजनेची इमारत मराठा वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सहकार व पणन मंत्र्याच्या हटवादी धोरणामुळे केराची टोपली दाखवण्यात आली. दुग्ध विकास विभागाला ८ ऑगस्ट रोजी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवले होते. मात्र, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी वसतिगृहासाठी मिळणाऱ्या दूध योजनेची इमारत बचत गटांना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बचत गटांसाठी इमारत देता येणार नसल्याचा अभिप्राय दिला. मात्र, एक वर्षाच्या भाडेतत्त्वावर ही इमारत पणन विभागाला देण्याचा तोडगा काढत मराठा वसतिगृहाचा प्रस्ताव फेटाळून लावला. 

‘पालकमंत्री खीळ घालत आहे’
दोन एकरच्या भूखंडावर मराठा वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव मंत्रालयात सहा महिने सहसचिवांकडे प्रलंबित होता. ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांत मराठा वसतिगृहे अस्तित्वात येतील अशी सरकारने ग्वाही दिली आहे. मात्र, सोलापूरच्या वसतिगृहासाठी पालकमंत्री खीळ घालत असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. 

Web Title: Maratha hostel issue