आता मराठा आरक्षणासंदर्भात 10 सप्टेंबर रोजी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून कायदेशीर बाबीसंदर्भातील हालचाली होत अाहेत. आज (मंगळवार) उच्च न्यायालयात यासंबंधीच्या याचिकेवर राज्य सरकार शपथपत्र दाखल करणार होते. मात्र आज न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, यासंदर्भातील पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे, तोपर्यंत कोणीही आंदोलन करु नये.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून कायदेशीर बाबीसंदर्भातील हालचाली होत अाहेत. आज (मंगळवार) उच्च न्यायालयात यासंबंधीच्या याचिकेवर राज्य सरकार शपथपत्र दाखल करणार होते. मात्र आज न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, यासंदर्भातील पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे, तोपर्यंत कोणीही आंदोलन करु नये.

#MarathaKrantiMorcha

दरम्यान, ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यातील विविध विषयावर काल (ता. 06) दीड तास चर्चा झाली, त्यानंतर सायंकाळी राज्यातील खासदार व महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासमेवत एक मोठी बैठक घेण्यात आली. त्यामध्येही प्रामुख्याने मराठा आरक्षणाबाबतच चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

Web Title: Maratha Kranti Morcha maratha reservation petition hearing