Maratha Kranti Morcha: मराठा- धनगर- मुस्लिमांचे आरक्षणात ऐक्‍य..!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर आता धनगर आरक्षणाचा उद्रेक झाला असून, मराठा क्रांती मोर्चाने धनगर आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे, मुस्लिम आरक्षणापाठोपाठ मराठा क्रांती मोर्चाने धनगर आरक्षणाचेही समर्थन केल्याने मराठा- धनगर- मुस्लिम असे आरक्षणासाठीचे ऐक्‍य झाल्याचे चित्र आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मराठा व मराठेतर अशा वादाची भीती व्यक्‍त होत होती. मात्र, त्या अगोदरच मराठा आंदोलनाचे मुस्लिम समाजाने जाहीर समर्थन केले होते. मराठा क्रांती मूक मोर्चात मुस्लिम समाजाने प्रत्येक ठिकाणी पाणी, चहा व अल्पोपाहाराची सेवा पुरवली होती. गावोगावी मराठा व मुस्लिम समाजाच्या या एकत्रित सहकार्याने आरक्षणाची मागणी अधिकच गडद झाल्याचे चित्र होते. त्यातच पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होत धनगर व मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाला धनगर व मुस्लिम समाजाने अनेक ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला होता. आता धनगर समाजाने आरक्षणाचे आंदोलन सुरू केलेले असताना मराठा समाजानेही त्याला पाठिंबा दिला आहे.

राज्यात आरक्षणाच्या मागणीची आंदोलने उग्र होत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारसमोर या आंदोलनांचा सामना करण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ही आंदोलने अधिकच आक्रमक होण्याची भीती आहे. त्यातच मराठा- धनगर- मुस्लिम समाजांत आरक्षणाच्या मागणीवर मतैक्‍य झाल्याने या तिन्ही समाजांचे एकत्रित आंदोलन झाल्यास सरकारसमोर कडवे आव्हान उभे राहण्याची भीती आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha Reservation Agitation Dhangar Muslim Reservation Aikya