Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चा उभारणार निर्णायक लढा

maratha kranti morcha
maratha kranti morcha

मुंबई - मराठा आरक्षण व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चाने निर्णायक लढ्याची आज घोषणा करत, १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय सरकारने घ्यावा, असे आवाहन केले. आज नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी राज्यभरातून आलेल्या समन्वयकांमधून पाठपुरावा व रणनीती समितीची स्थापना करण्यात आली. 

सरकारने आंदोलन कर्त्यावरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आवाहनदेखील या वेळी करण्यात आले. मराठा होस्टेल्सची उभारणी मे २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, दुष्काळ जाहीर करावा, ॲट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा मागण्याही बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाची नव्याने स्थापना करण्यात आलेल्या कोअर कमिटीचे सदस्य प्रत्येक जिल्ह्यात दौरा करून मराठा संघटन व जागृती करणार आहेत. गावोगावी मराठा संवाद मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

मराठा नावाने राजकीय पक्ष नाही
मराठा क्रांती नावाने जर कोणी राजकीय पक्ष स्थापन करणार असेल तर त्यांना मराठा क्रांती मोर्चा धडा शिकवेल. मराठा समाजाचं नाव वापरून राजकीय पक्ष खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com