Maratha Kranti Morcha : एसटी महामंडळाचा अघोषित बंद, 20 कोटी महसूल बुडाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचा अघोषीत बंद होता. बंद दरम्यान गाड्यांच्या सुरक्षतेसाठी महामंडाळाने आगारातून गाड्या सोडल्याच नाहीत. काही ठिकाणी सुरू असलेल्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने 16 बसेसची मोडतोड करण्यात आली. बंदमुळे महामंडळाचे 20 कोटी महसूल बुडाला आहे.

राज्यातील बहुतांशी वाहतूक सकाळपासून बंद होती. एसटीच्या एकुण दिवसभरातील फेरी 1 लाख 8 हजार असतात. त्याद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवाश्यांना सेवा दिली जाते. मात्र आज आंदोलनामुळे 90 टक्के वाहतूक होवू शकली नाही. बाहेरगावी जाण्यासाठी बस स्थानकात जाण्यासाठी आलेल्या प्रवाश्यांच्या प्रचंड हाल झाले. मुंबई, कोकण(पालघर वगळता) पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, नाशिक भागात बंदमुळे अपवाद वगळता एसटी बस फेरी होऊ शकल्या नाहित. विदर्भात 50 टक्के वाहतुक सुरळीत होती तर पालघर विभागात 83 टक्के वाहतूक सुरू होती.

- दिवसभरातील 80 हजार 209 फेऱ्या पैकी 8056 फेरी पुर्ण

- 16 बसेसची मोडतोड, (नाशिक-5,औरंगाबाद 11,नागपूर 1)

- राज्यातील 218 आगार बंद होते 

- एकूण बस ताफा 18890
- 93 टक्के बस धावल्या नाहीत

Web Title: Maratha Kranti Morcha : ST corporation unveiled closure, 20 crores revenue seized