मराठा क्रांती मोर्चाची उद्या गोलमेज परिषद

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - आपल्या मागण्या आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बुधवारी (ता.19) कोल्हापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोलमेज परिषद होणार आहे.

मुंबई - आपल्या मागण्या आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बुधवारी (ता.19) कोल्हापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोलमेज परिषद होणार आहे.

याबाबत मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या मागण्यांच्या निवेदनावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शन व प्रबोधन, शेतीविषयक प्रश्‍नावर चर्चा, मराठा आरक्षण, विद्यार्थ्यांची शुल्क माफी, कोपर्डी घटनेतील पीडितास त्वरित न्याय मिळवणे, तसेच मराठा समाजातील स्वयंघोषित आयोजकांवर कारवाई करणे आदी विषयांवर या गोलमेज परिषदेत मंथन होणार आहे.

Web Title: maratha kranti morcha tomorrow golmej conferance