यापूर्वीही 'या' मुख्यमंत्र्यांना करता आली नाही पूजा

रविवार, 22 जुलै 2018

महाराष्ट्राची माऊली विठ्ठलाच्या चरणाची ओढ लागलेल्या लाखो सहिष्णू वारकऱ्यांनी पंढरी गजबजत असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग वाढली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या पुजेला जाणार नाही हा निर्णय घेतला अन् आषाढीची सरकारी पुजा पुन्हा वादात सापडली. मराठा समाजाच्या भावना व वारीमध्ये काही गोंधळ होऊन वारकऱ्यांची अडवणूक होणार नाही, यासाठी मुख्यमंत्र्यानी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुजेला न जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही काही मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करता आलेली नाही.

सोलापूर- महाराष्ट्राची माऊली विठ्ठलाच्या चरणाची ओढ लागलेल्या लाखो सहिष्णू वारकऱ्यांनी पंढरी गजबजत असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग वाढली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या पुजेला जाणार नाही हा निर्णय घेतला अन् आषाढीची सरकारी पुजा पुन्हा वादात सापडली. मराठा समाजाच्या भावना व वारीमध्ये काही गोंधळ होऊन वारकऱ्यांची अडवणूक होणार नाही, यासाठी मुख्यमंत्र्यानी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुजेला न जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही काही मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करता आलेली नाही.

यापूर्वी 1996 साली राज्यात युतीचे सरकार असताना मनोहर जोशी यांनी आषाढीची पूजा रद्द केली होती. मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला होता, त्यावेळी दलित संघटनांनी मनोहर जोशींना पुजा करण्यासाठी विरोध केला होता. त्यामुळे वारीला गालबोट लागू नये या उद्देशाने मनोहर जोशी यांनी पूजा न करण्याचा निर्णय घेतला होता. 

त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री आर. आर पाटील यांनाही कार्तिकीची पुजा रद्द करावी लागलेली आहे. तसेच, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनाही कार्तिकीची पुजा करण्यापासून यापूर्वी रोखण्यात आले होते.

Web Title: maratha kranti morcha wari issue leaders avoided vitthal pooja