Maratha Reservation : उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर मागे

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा आंदोलकांवर खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्व खटले त्वरित मागे घेण्यात येतील. याशिवाय यामध्ये ज्यांना बनावट गुन्हांखाली अटक करण्यात आली अशा लोकांची लवकरच सुटका करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) मराठा आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

मराठा समाजाच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर उपोषण आंदोलन मागे घेतले आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते म्हणाले, ''ज्यांना बनावट गुन्हांखाली अटक करण्यात आली अशा लोकांची लवकरच सुटका करण्यात येईल. ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांवर खोटे खटले दाखल करण्यात आले. हे सर्व खटले मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.''

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही मराठा बांधवांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली.  

Web Title: Maratha Reservation After the assurance of Uddhav Thackeray the agitation finally ended