Maratha Reservation : अखेर सरकारला मराठा समाजापुढे झुकावे लागलेच : निलेश राणे

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. तर मराठा समाजाने ते मिळवलं. अखेर सरकारला मराठा समाजासमोर झुकावे लागलेच, असे ट्विट त्यांनी केले. 

मराठा आरक्षणाच्या विधेयकाला विधानसभेत मंजूरी देण्यात आली. त्यानंतर ट्विट करून नितेश राणे यांनी सांगितले, की ''मराठा आरक्षण दिलं नाही. तर मराठा समाजाने ते मिळवलं. यासाठी 58 मोर्चे काढण्यात आले होते. तसेच 14600 मुलांवर पोलिस खटले दाखल झाले आहेत. या आरक्षणासाठी 42 लोकांनी बलिदान दिले. राणे समितीचा अहवाल बदलून स्वीकारायला लागलाच. अखेर सरकारला मराठा समाजासमोर झुकावेच लागेल. एक मराठा लाख मराठा''.   

दरम्यान, मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झाले. विरोधकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. 

Web Title: Maratha Reservation BJP Government had to bow down to the Maratha Community says Nitesh Rane