मराठा युवकांनी संयम बाळगण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील सुनावणीनंतर याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. त्यासाठी मराठा युवकांनी संयम बाळगायला हवा. लोकशाही मार्गानेच मराठा आरक्षणाचा लढा सुरू ठेवायचा आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी केले.

उच्च न्यायालयाच्या आवारात माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांच्यावर आज जालना येथील बेरोजगार युवक वैजिनाथ पाटील याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पाटील याने केलेल्या या कृत्याचे समर्थन करता येणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाला न्यायालयात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. याचा राग मनात धरून पाटील याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. 

आरक्षणाचा न्यायालयीन संघर्ष लोकशाही व कायदेशीर मार्गानेच सुरू आहे. अशा वेळी मराठा तरुणांनी भावनेच्या भरात कायदा हातात घेऊ नये. त्यावर बेकायदा कृत्याचे पडसाद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे मोर्चाच्या वतीने स्पष्ट केले.

Web Title: Maratha Reservation Maratha Youth Control