वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (गुरुवार) दिला. 

डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ आणि डॉ. आदिती गुप्ता यांच्यासह काही उमेदवारांनी दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण (एसईबीसी) पूर्वलक्षीप्रभावाने लागू करण्यावर आक्षेप घेतला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने यावर आज (गुरुवार) सुनावणी घेतली.

दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीदरम्यान वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com