विरोधी याचिकेवर जानेवारीत सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - मराठा व ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवर ९ जानेवारीला सुनावणी घेण्यात येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. 

मुंबई - मराठा व ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवर ९ जानेवारीला सुनावणी घेण्यात येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. 

केवळ जातीच्या मुद्द्यावर आरक्षण मिळू शकत नाही, त्यासाठी समाजाचे मागासलेपण स्पष्ट होणे अत्यावश्‍यक आहे; मात्र ओबीसी समाजातील अशा बाबींची पडताळणी करण्यात आलेली नाही, असा दावा याचिकादार प्रा. बाळासाहेब सराटे यांनी केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी याचिकेचा उल्लेख झाला. ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ३२ ते ३४ टक्के आहे; मात्र आरक्षणाची तरतूद ३४ टक्के आहे. म्हणजेच जादा आरक्षण दिले जात आहे, असा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. 

Web Title: Maratha Reservation OBC Reservation Oppose Petition Result