Maratha Reservation : आम्ही दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणारच; कारण... : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात आले. तसेच यासाठी कायेदशीर प्रक्रिया पडताळूनच आरक्षण देण्यात आले. कायदेशीर अचूकता पाळल्याने हे आरक्षण टिकेल.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात आले. तसेच यासाठी कायेदशीर प्रक्रिया पडताळूनच आरक्षण देण्यात आले. कायदेशीर अचूकता पाळल्याने हे आरक्षण टिकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. 

- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

- संविधानात आरक्षणाबाबत कलम ठेवण्यात आले आहेत.

-  आरक्षणाबाबतचे अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहेत

- आरक्षणाबाबत कोणतीही शंका उपस्थित करू नये

- कायद्यातील कलमाद्वारे ओबीसी आरक्षण

- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण

- कायदेशीर प्रक्रिया अभ्यासून मराठा आरक्षण दिलं

- समाज एकत्रित मागणी करत होता. त्यांचे ऐकले. हे सगळ्यांचे श्रेय

- मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत जीआर काढला.

- 200 मुलांबाबतचा निर्णय यापूर्वी घेतला. आता 300 मुलांबाबत लवकरच निर्णय घेऊ.

- कोणीही समाजात फूट पाडण्याचे काम करू नये.

- घटनात्मक आवश्यकता पूर्ण करून आरक्षण दिले.

- कायदेशीर अचूकता पाळल्याने हे आरक्षण टिकेल

- एकमताने पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार 

 

Web Title: Maratha Reservation The reservation we given will remain in the court says CM Devendra Fadnavis