Maratha Reservation : 'साहेबांच्या दूरदृष्टीनेच मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर'

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेने एक पत्रक काढून याबाबत अभिनंदन केले. ''उद्धवसाहेबांच्या दूरदृष्टीने मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला'', असे पत्रकात म्हटले आहे. मराठा आरक्षण जाहीर!!! समस्त मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन, असे ट्विटरवरून सांगितले.

शिवसेनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले, की ''मराठा समाज बांधवांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. मराठा आरक्षण टिकणारं पक्क विधेयक बनवा. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी ही तत्काळ करावी. इतर आरक्षण वर्गाला धक्का न लावता आरक्षण विधेयक आणावं, यांसारख्या मागण्या उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केल्या असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे विरोधकांनीही अनेकदा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर आज अखेर आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. हे विधेयक सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता शिवसेनेने हे पत्रक जारी केले.

Web Title: Maratha Reservation ShivSena celebrate Maratha reservation bill in assembly