#MarathaKrantiMorcha बांध फुटतोय मोर्चातील संयमाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

मुंबई - शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील संयमाचा बांध फुटत चालल्याचे चित्र दिसत आहे. हे आंदोलन हिंसक वळणाकडे ओढ घेत आहे. मोर्चात अखेर जहाल व मवाळ असे दोन गट पडल्याने सरकारसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. 

मुंबई - शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील संयमाचा बांध फुटत चालल्याचे चित्र दिसत आहे. हे आंदोलन हिंसक वळणाकडे ओढ घेत आहे. मोर्चात अखेर जहाल व मवाळ असे दोन गट पडल्याने सरकारसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. 

जहाल गटाने मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा काढल्याने राज्यभरातून विद्यार्थी व बेरोजगार युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तुळजापूरपासून सुरू झालेल्या या ठोक मोर्चाच्या आंदोलनाकडे सुरवातीला सरकारने दुर्लक्ष केल्याने आता हे आंदोलनकर्ते संतप्त होत हिंसक वळणावर पोचल्याचे चित्र आहे. राज्यभरात विविध ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक, सरकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू झाल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सोलापूर, बीड, जालना, परभणी, नवी मुंबई, सातारा, पुणे, उस्मानाबाद, लातूर 

दोन वर्षे सरकारने मराठा आरक्षणाचे गाजर दाखवत समाजाच्या भावनांशी खेळ केला आहे. शिक्षण व रोजगार यामध्ये मराठा युवकांना आरक्षणाची संधी देण्यात सरकार अकारण वेळकाढूपणा करीत आहे. यामुळे मराठा समाज मूक मोर्चा नव्हे, तर ठोक मोर्चा काढून रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या निर्णयाशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. 
- महेश डोंगरे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक 

आरक्षणाच्या आंदोलनाच्या कारणावरून कार्यकर्त्यांची धरपकड केल्यास आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पसरेल. कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे थांबवा, अन्यथा मला अटक करा.
- भारत भालके, आमदार 

मुख्यमंत्री पंढरपूरला विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार असतील, तर त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊनच यावे. अन्यथा, त्यांना श्री विठ्ठलाची पूजा करू देणार नाही.
- प्रिया नागणे, जिजाऊ ब्रिगेडच्या पंढरपूर विभाग अध्यक्षा

Web Title: #MarathaKrantiMorcha agitation Violent