मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, विशेष अधिवेशन घ्या : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई : सरकारने आधीच दखल घेतली असती, तर कोणालाही जीव गमवावा लागला नसता. आता चर्चा नाही कृती करण्याची गरज आहे. यासाठी सर्व पक्षांची भूमिका समजून घेऊन एक दिवसाचे विशेष अधिवेशन झाले पाहिले. त्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय घेता येईल. असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. #MarathaKrantiMorcha

मुंबई घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टिका केली. चव्हाण म्हणाले, "न्यायालयाती सुनावणी टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जाती-जातीच संघर्ष पेटवून मराठा समाजाला एकटे पाडण्याचा सरकारच प्रयत्न असून, यातून मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. भीमा कोरेगावच्या दंगलीतही मराठा विरुद्ध दलित असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. केवळ मराठाच नाहीतर धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकारकडून काही निर्णय घेण्यात आला नाही. यासाठी फुले-शाहू, आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व समाजांनी एकत्र येऊन सरकारचा हा कुटील डाव उधळून लावला पाहिजे." 

मुख्यमंत्र्यांनी केवळ दिखावपणा करून सरकारचा नाकर्तेपणा, उदासिनता दाखवत हे आरक्षणाचे घोंगड असेच भिजवत ठेवले आहे. यामुळेच मराठा समाजाचा उद्रेक झाला. त्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री बेताल वक्तवे करत आहेत, ती थांबली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी कालबद्ध पद्धतीने सोडवावी.

Web Title: #MarathaKrantiMorcha Chief Minister should apologize, take special session: Ashok Chavan